Pranali Kodre
बीसीसीआयने २४ मे रोजी शुभमन गिलची भारताचा कसोटी कर्णधार म्हणून घोषणा केली.
रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर गिलची कर्णधारपदासाठी चर्चा होत होती, अखेर बीसीसीआयने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
त्यामुळे २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो भारताचे नेतृत्व करताना दिसेल.
ज्यावेळी इंग्लंडमध्ये २० जून रोजी गिल भारताचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार ठरेल.
शुभमन गिलने डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीतून पदार्पण केले होते.
गेल्या ४ वर्षात तो भारतासाठी ३२ कसोटी सामने खेळला आहे.
गिलने ३२ कसोटीत ३५.०५ सरासरीने ५ शतके आणि ७ अर्धशतकांसह १८९३ धावा केल्या आहेत.
२०२३ मध्ये अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने सर्वोच्च १२८ धावांची खेळी केली होती.