Pranali Kodre
भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे, पण यादरम्यान त्याने डोळ्यांच्यावर कपळावर एक छोटं डिव्हाईस लावल्याचे दिसत आहे.
Shubman Gill's Temple Device
Sakal
असंच डिव्हाईस भारताचा बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही तिच्या कपाळावर यापूर्वी अनेकदा लावल्याचे दिसले आहे.
PV Sindhu's Temple Device
Sakal
त्यामुळे हे डिव्हाईस नेमकं आहे काय, याची उत्सुकता क्रीडा चाहत्यांमध्ये आहे.
Shubman Gill's Temple Device
Sakal
खरंतर हे छोटे वेअरेबल (Wearable) डिव्हाईस 'टेंपल' (Temple) आहे. याची निर्मिती 'झोमॅटो'चे सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांनी केली आहे.
Shubman Gill's Temple Device
Sakal
हे डिव्हाईस कपाळावर किंवा डोक्याच्या बाजूला एका विशिष्ट अडेसिव्ह ग्रिपच्या सहाय्याने स्थिर बसवले जाते.
Shubman Gill's Temple Device
Sakal
या डिव्हाईसमध्ये 'पीपीजी' (PPG) सारखे प्रगत ऑप्टिकल सेन्सर्स वापरले गेले असून यातून मेंदूतील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनच्या पातळीची मोजणी करताना मदत होते.
Shubman Gill's Temple Device
Sakal
याशिवाय हे डिव्हाईस खेळाडूच्या मज्जासंस्थेचा (Nervous System) प्रतिसाद, मानसिक ताण आणि थकवा मोजण्यासाठी 'एंट्रॉपी स्कोर' (Entropy Score) देते.
PV Sindhu's Temple Device
Sakal
गिल, सिंधू यांसारखे खेळाडू ताण, एकाग्रता टिकवण्याची क्षमता, मानसिक थकवा, रिकव्हरी ट्रॅक करण्यासाठी या डिव्हाईसचा वापर करत आहेत.
Shubman Gill's Temple Device
Sakal
दरम्यान, हे डिव्हाईस अद्याप बाजारात उपलब्ध झालेलं नसून खेळाडूंकडून सध्या प्रायोगिक तत्त्वावर वापरले जात आहे.
Shubman Gill's Temple Device
Sakal
Most T20I Wickets Against New Zealand Top 5 Indian Bowlers
Sakal