Pranali Kodre
बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार २०२४-२५ वितरण सोहळा नुकताच १५ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीमध्ये पार पडला.
Most BCCI Cricketer of the Year award
Sakal
बीसीसीआयकडून सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा पॉली उम्रीगर पुरस्कार २००६-०७ पासून दिला जातो.
Shubman Gill
Sakal
२०२४-२५ पुरस्कार वितरण सोहळ्यात पॉली उम्रीगर पुरस्कार शुभमन गिलला मिळाला.
Shubman Gill
Sakal
त्याने हा पुरस्कार जिंकण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२२-२३ मध्येही त्याला हा पुरस्कार मिळाला होता.
Shubman Gill
Sakal
त्यामुळे त्याने सर्वाधिकवेळा बीसीसीआयचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकर आणि आर अश्विन यांची बरोबरी केली आहे.
Sachin Tendulkar
Sakal
सचिनने २००६-०७ आणि २००९-१० या हंगामात, तर अश्विनने २०१२-१३ आणि २०२०-२१ या हंगामात हा पुरस्कार जिंकला आहे.
R Ashwin
Sakal
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असून त्याने २०१८-१९, २०२१-२२ आणि २०२३-२४ या तीन हंगामात हा पुरस्कार जिंकला आहे.
Jasprit Bumrah
Sakal
अव्वल क्रमांकावर विराट कोहली असून त्याने ५ वेळा हा पुरस्कार जिंकला. त्याने २०११-१२, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या ५ हंगामात हा पुरस्कार जिंकला आहे.
Virat Kohli
Sakal
Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage
Sakal