Anuradha Vipat
अभिनेत्री पलक तिवारीचं नाव इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेलं आहे
आता या चर्चांवर अखेर तिची आई आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने मौन सोडलं आहे.
तसेच पलकच्या ट्रोलिंगवरही तिने प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतीत श्वेता म्हणाली की, “मला अफवांमुळे आता काही फरक पडत नाही. इतक्या वर्षांत मला एक गोष्ट समजली ती म्हणजे लोकांची स्मरणशक्ती फक्त चार तासच टिकते.
पुढे श्वेता म्हणाली की, अफवांच्या मते माझी मुलगी दर तिसऱ्या मुलाला डेट करतेय आणि मी दरवर्षी लग्न करतेय. .
पुढे श्वेता म्हणाली की, इंटरनेटच्या मते माझं तीन वेळा लग्न झालंय. त्यामुळे मला आता याने काही फरक पडत नाही.
कलाकारांविषयी काही नकारात्मक लिहिलं ते खपलं जातं. त्या काळाचा सामना केल्यानंतर आता मला कशानेच फरक पडत नाही असं श्वेता म्हणाली