आठराव्या वर्षी लग्न अन् विसाव्या वर्षी आई...

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु अभिनेत्री श्वेता तिवारीचं वय तब्बल ४३ वर्षे इतकं आहे

केवळ १२ वर्षांची असताना श्वेताने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. सुरुवातीला तिने भोजपुरी इंडस्ट्रीत काम केलं

याचदरम्यान दिग्दर्शक राजा चौधरीसोबत तिने आठराव्या वर्षीच लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नाला तिच्या कुटुंबाचा विरोध होता

लग्नानंतर दोनच वर्षांनी पलकचा जन्म झाला. परंतु त्यानंतर तिचं नवऱ्यासोबतचं नातं तुटलं. लग्नानंतर ९ वर्षांनंतर तिचा घटस्फोट झाला

२००७ मध्ये पहिल्या नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर २०१२ मध्ये तिची अभिनव कोहलीसोबत जवळीकता आली. २०१३ मध्ये तिने दुसरं लग्न केलं

दोघांना एक मुलगा झाला. परंतु २०१९ मध्ये पुन्हा तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर श्वेता एकटीच जीवन व्यतीत करीत आहे

एवढं सगळं होऊनही श्वेता आजही तरुणींना लाजवेल अशीच दिसते.

श्वेताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आजही चाहते तिच्या नवनव्या फोटोंच्या प्रतीक्षेत असतात

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal