सकाळ डिजिटल टीम
श्वेता रेखा संतोष विश्वकर्मा या धाडसी तरुणीने रायगड जिल्ह्यात असंख्य बचाव मोहिमा आणि कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तिच्या धैर्य, कौशल्य, आणि समर्पणामुळे श्वेताला 'रायगडची हिरकणी' हा मान दिला गेला आहे.
श्वेता सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची सदस्य असून, विविध बचाव मोहिमांमध्ये महत्त्वाचा सहभाग घेत आहे.
श्वेताचा जन्म 30 जानेवारी 2003 रोजी अलिबाग येथे झाला. तिने भौतिकशास्त्रात पदवी घेतली आहे आणि सध्या मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स इन इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत आहे.
श्वेताला लहानपणापासून वन्यजीव आणि बचाव कार्यांमध्ये रुची आहे. तिने बिनविषारी साप हाताळणे, माउंटनिंग, वॉटर रेस्क्यू, फायर सेफ्टी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले आहे.
श्वेताने महाड औद्योगिक क्षेत्रातील अपघातात ११ जणांचे प्राण वाचवले आहेत आणि साडेतीनशेहून अधिक रस्ते अपघातांमध्ये मदत केली आहे.
श्वेताने अनेक युवक-युवतींना बचाव कार्याचे प्रशिक्षण दिले असून, तिच्या कार्यामुळे अनेक युवा प्रेरित होऊन या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहे.