Anuradha Vipat
सिद्धार्थने बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर करत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
नुकताच तो कामानिमित्त मुंबई ते गोवा असा विमानप्रवास करत होता.
परंतु, या प्रवासादरम्यान सिद्धार्थला संतापजनक अनुभव आला.याबद्दल एक्स पोस्ट शेअर करत अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच घडल्याप्रकाराचा व्हिडीओ देखील त्याने शेअर केला आहे. नामांकित विमान कंपनीचा उल्लेख करत सिद्धार्थ म्हणतो, “हाय नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता नुकताच इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही स्वत:च बघा त्यांनी माझ्या बॅगेची कशी काळजी घेतली आहे. या लोकांनी फक्त माझ्या बॅगेचं हँडलच नीट ठेवलंय. बाकी तुम्हीच माझी संपूर्ण बॅग बघा.
सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सिद्धार्थ नुकताच ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटात झळकला होता.