Anuradha Vipat
सिद्धार्थ जाधव नेहमी चर्चेत असतो.
सध्या सिद्धार्थ जाधव ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमात सिद्धार्थ सूत्रसंचालनाची भूमिका निभावत आहे.
आज ‘आता होऊ दे धिंगाणा’चा १००वा भाग प्रसारित होणार आहे.
त्यानिमित्ताने सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट लिहिली आहे.
फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिलं आहे की, “काय आणि कसे आभार मानू ‘स्टार प्रवाह’ टीमचे…मला कळतं नाही…’आता होऊ दे धिंगाणा’चा शंभरावा एपिसोड…
सिद्धार्थने लिहिलं आहे की,बापरे मी या कार्यक्रमाचा भाग होईन किंवा हा कार्यक्रम मला होस्ट करायला मिळेल आणि महाराष्ट्राचे मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील हे कधीच वाटलं नव्हतं