संतोष कानडे
पाणी शरीरासाठी जीवनदायी असलं तरी ते चुकीच्या पद्धतीने पिणे आरोग्यास घातक ठरू शकतं.
अनेकांना उभं राहून घाईघाईत पाणी पिण्याची वाईट सवय असते, ज्याचे गंभीर दुष्परिणाम होतात.
उभं राहून पाणी पिल्याने किडनीवर ताण येतो आणि किडनीचे कार्य बिघडण्याचा मोठा धोका असतो.
यामुळे शरीरातील नसा ताणल्या जातात आणि द्रवाचे संतुलन बिघडून सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.
उभे असताना पाणी पिल्याने ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होऊन फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
शरीराला आवश्यक ऑक्सिजन न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यक्षमतेवरही होतो.
पाणी थेट वेगाने पोटाच्या खालच्या भागात आदळल्यामुळे पचनसंस्थेला मोठा धक्का बसतो.
पचनक्रिया मंदावल्यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि गॅससारख्या पोटाच्या तक्रारी निर्माण होतात.
म्हणूनच उभे राहून पाणी पिण्याऐवजी नेहमी शांतपणे एका जागी बसावे.
आरोग्याच्या उत्तम फायद्यांसाठी पाणी नेहमी बसून आणि घोट-घोट करूनच प्यावे.