एसीरूममधून बाहेर पडल्यानंतर आरोग्याचे काय नुकसान होते?

Monika Lonkar –Kumbhar

उकाडा

सध्या देशभरातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी मग नागरिक कूलर, फॅन, एसी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

आरोग्याचे नुकसान

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. परंतु, एसीचा सर्वाधिक वापर केला तर आरोग्याचे नुकसान देखील होऊ शकते.

एसीचा सर्वाधिक वापर धोकादायक

एसीमध्ये बराच वेळ बसल्यानंतर, बाहेर गरम हवेत गेल्यावर वातावरणात अचानक बदल होतो. याचा आरोग्यावर परिणाम होतो.

उष्माघात

शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास असमर्थता आल्यास उष्माघाताचा धोका वाढतो.

हृदयविकाराचा धोका

एसीतील थंड वातावरणाचा प्रभाव हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर होतो. त्यामुळे, हृदयविकाराचा धोका वाढतो.

अस्थमा

जास्त तापमानाच्या अचानक संपर्कात आल्याने अस्थमासारख्या श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

शेवग्याची शेंगच नव्हे तर, पावडर देखील आरोग्यासाठी फायदेशीर

Benefits of Moringa Powder | esakal