सकाळ डिजिटल टीम
अंडी ही पोषणमूल्यांनी भरपूर असली, तरीही जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेषतः अंड्याच्या अति सेवनामुळे अनेक शारीरिक त्रास निर्माण होण्याची शक्यता असते.
आपल्याला Egg Roll किंवा इतर अंड्याचे पदार्थ खायला आवडतात. मात्र, एका अंड्यात सुमारे १८६ मि.ग्रा. कोलेस्ट्रॉल असतो, जो रोजच्या गरजेच्या निम्म्याहून अधिक आहे. जास्त अंडी खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल वाढून हृदयरोगाचा धोका वाढतो.
अंड्यांमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन आढळतो. जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते. यामुळे त्वचेवर फोड, पुरळ आणि मुरुम होण्याची शक्यता वाढते.
अंडी ही मुलांमध्ये अॅलर्जी निर्माण करणारा प्रमुख पदार्थ आहे. काहींना अंडी किंवा अंड्यापासून तयार पदार्थ खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, मुरुम, तसेच पचनाच्या समस्या जाणवतात.
संशोधनानुसार, जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास मधुमेह, प्रोस्टेट, कोलन आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे अंड्याचे मर्यादित व संतुलित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.
अंड्याच्या पांढऱ्या भागात अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन असतो, जो काही लोकांच्या पचनासाठी कठीण असतो. जास्त अंडी खाल्ल्यास पचनसंस्था बिघडू शकते. यामुळे पोटदुखी, अपचन, उलट्या आणि गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात.
अंडी हे खरोखरच पोषणमूल्यांनी परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे. मात्र, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात घेतल्यास ती हानिकारक ठरू शकते. अंड्याचे प्रमाण आणि शरीराची गरज यांचा समतोल राखल्यास अंड्याचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकतो.