संतोष कानडे
हँडवॉशमधील रसायनांमुळे हाताच्या त्वचेतील नैसर्गिक तेल आणि ओलावा निघून जातो, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते.
वारंवार हात धुतल्याने हातांना खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचा लाल पडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
त्वचेचा कोरडेपणा वाढल्यास तळहातांवर आणि बोटांच्या बेचक्यात भेगा पडून त्यातून रक्त येण्याची शक्यता असते.
अतिवापरामुळे 'कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस' किंवा 'एक्झिमा'सारखे त्वचेचे विकार बळावू शकतात.
आपल्या त्वचेवर शरीराचे रक्षण करणारे अनेक 'चांगले बॅक्टेरिया' असतात, ते वारंवार हात धुतल्याने नष्ट होतात.
नैसर्गिक संरक्षण नष्ट झाल्यामुळे त्वचेची प्रतिकारशक्ती कमी होते आणि बाहेरून संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो.
ॲन्टी-बॅक्टेरियल हँडवॉशमध्ये असणाऱ्या ट्रायक्लोसन सारख्या घटकांमुळे बॅक्टेरिया कालांतराने औषधांना दाद न देणारे बनू शकतात.
हँडवॉशमधील तीव्र रासायनिक घटकांमुळे नखे कमकुवत, कोरडी आणि ठिसूळ होऊन तुटू लागतात.
साबणातील कृत्रिम सुगंध आणि प्रिजर्व्हेटिव्ह्जमुळे संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींमध्ये ॲलर्जीची समस्या वाढू शकते.
त्वचेचा नैसर्गिक pH समतोल बिघडल्यामुळे हाताची त्वचा अकाली सुरकुतलेली आणि खडबडीत दिसू लागते.
mongoose
esakal