Aarti Badade
पेरूमध्ये फायबर जास्त असतो. ज्यांना अपचन, गॅस, अॅसिडिटी असे त्रास असतील त्यांनी ते खाणे टाळावे.
पेरूमध्ये नैसर्गिक साखर असते. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पेरू खावा.
काही लोकांना पेरूपासून अॅलर्जी होऊ शकते – उदा. पुरळ, खाज, श्वासाचा त्रास.
पेरूच्या बियांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. अशा लोकांनी बिया न खाणेच योग्य.
रात्री पेरू खाल्ल्याने घसा खवखवणे, वेदना, सर्दी होऊ शकते.
व्हिटॅमिन C चे प्रमाण जास्त असल्यामुळे काही गर्भवती महिलांसाठी हे त्रासदायक असू शकते. डॉकरांचा सल्ला घ्यावा.
शंका असल्यास आणि आरोग्यविषयी अनिश्चितता असल्यास कोणताही आहार बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.