तासन् तास उभे राहून काम केल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

Aarti Badade

पायांना सूज येण्याचा मुख्य त्रास

दीर्घकाळ उभे राहिल्याने गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील रक्त पायाच्या खालच्या भागात साचू लागते, ज्यामुळे घोटे आणि पायांवर सूज येते.

Side Effects of Standing Too Long at Work

|

Sakal

'व्हेरिकोज व्हेन्स'चा गंभीर आजार

सतत एकाच जागी उभे राहिल्याने पायांमधील शिरांवर अतिरिक्त दाब पडतो, ज्यामुळे त्या फुगून निळ्या-जांभळ्या रंगाच्या दिसू लागतात.

Side Effects of Standing Too Long at Work

|

Sakal

तीव्र कंबर आणि पाठदुखी

खूप वेळ हालचाल न करता उभे राहिल्यामुळे पाठीचा कणा आणि कंबरेच्या स्नायूंवर प्रचंड ताण येऊन पाठीचे जुने आजार बळावतात.

तळपायांची जळजळ आणि टाचदुखी

दीर्घकाळ उभ्या राहणाऱ्या नोकरदार लोकांना टाचदुखी, तळपायांची आग होणे आणि पायांचे स्नायू आखडणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Side Effects of Standing Too Long at Work

|

Sakal

रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा

हालचाल न करता उभे राहिल्याने पायांमधून हृदयाकडे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात.

Side Effects of Standing Too Long at Work

|

Sakal

वजन शिफ्ट करणे आणि कम्प्रेशन सॉक्स

उभे राहताना दर काही मिनिटांनी वजन एका पायावरून दुसऱ्या पायावर शिफ्ट करावे आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी कम्प्रेशन सॉक्स वापरावेत.

Side Effects of Standing Too Long at Work

|

Sakal

आरामदायक शूज आणि ब्रेक घेणे

या त्रासापासून वाचण्यासाठी काम करताना मध्येच थोडा वेळ बसावे आणि नेहमी मऊ कुशन असलेल्या योग्य शूजचा वापर करावा.

Side Effects of Standing Too Long at Work

|

Sakal

शरीरात अचानक कुठेही वेदना का सुरू होते?

Causes of Sudden Body Pain

|

Sakal

येथे क्लिक करा