थंडगार एसी आरोग्यासाठी ठरू शकतो हानिकारक

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

सध्या देशात सगळीकडेच उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक पंखा, एसी आणि कुलरची मदत घेत आहेत. जेणेकरून शरीराला थंडावा मिळू शकेल.

एसी

परंतु, एसीरूममध्ये बराच वेळ बसून अचानक बाहेर आल्यानंतर प्रचंड उष्णता जाणवते. त्यामुळे आरोग्याची हानी होण्याची शक्यता अधिक आहे.

त्वचा कोरडी पडते

सातत्याने एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी पडते.

अंगदुखी

जास्त काळ एसीमध्ये बसल्यामुळे अंगदुखीसारखी समस्या उद्भवू शकते.

रात्रभर एसीमध्ये झोपल्यास कंबरदुखी, डोकेदुखी, हाडे ठिसूळ होणे अशा समस्यांमुळे तब्येत बिघडू शकते.

सर्दी-खोकल्याची समस्या

सातत्याने एसीमध्ये बसल्यामुळे खूप थंडी जाणवते. त्यामुळे, सर्दी-खोकला ताप होण्याची शक्यता अधिक असते.

पूजा हेगडेचा रेड बलून लूक होतोय व्हायरल..!