लघवीचा रंग सांगतोय तुमच्या किडनीचं आरोग्य! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

शरीराची फिल्टर प्रणाली

किडनी हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे फिल्टर आहे, जे रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पाणी गाळून ते लघवीवाटे शरीराबाहेर टाकते.

Urine Color & Kidney Health

|

Sakal

लघवी आणि किडनीचा संबंध

लघवीची निर्मिती थेट किडनीत होते. जर लघवीच्या रंगात किंवा प्रमाणात बदल झाला, तर समजावे की तुमच्या फिल्टर प्रणालीमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे.

Urine Color & Kidney Health

|

Sakal

फेसाळ लघवी

जर तुमची लघवी खूप फेसाळ असेल, तर ते 'प्रोटीन्युरिया'चे लक्षण असू शकते. याचा अर्थ तुमच्या लघवीतून मोठ्या प्रमाणात प्रथिने (Proteins) गळून बाहेर पडत आहेत.

Urine Color & Kidney Health

|

sakal

मधुमेहाचा पहिला इशारा

अनियंत्रित मधुमेह हे किडनी खराब होण्याचे प्रमुख कारण आहे. लघवीतून प्रथिने बाहेर जाणे हे मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होत असल्याचे पहिले लक्षण मानले जाते.

Urine Color & Kidney Health

|

Sakal

लघवीचा बदललेला रंग

सामान्यतः लघवीचा रंग फिकट पिवळा असतो. मात्र, जर तो लाल, तपकिरी किंवा अति गडद वाटत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Urine Color & Kidney Health

|

Sakal

लघवीच्या प्रमाणात बदल

लघवीचे प्रमाण नेहमीपेक्षा खूप कमी होणे, वारंवार लघवीला जावे लागणे किंवा लघवीवर नियंत्रण न राहणे ही किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

Urine Color & Kidney Health

|

Sakal

शरीरावरील इतर परिणाम

किडनीच्या आजारामुळे केवळ लघवीच नाही, तर हात-पायांना सूज येणे, सतत थकवा जाणवणे, मळमळ आणि उलट्या होणे असा त्रासही होऊ शकतो.

Urine Color & Kidney Health

|

Sakal

वेळीच व्हा सावध!

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या ४०% लोकांना किडनीचा आजार होण्याचा धोका असतो. नियमित तपासणी आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे.

Urine Color & Kidney Health

|

Sakal

झोपेत छातीत ‘ही’ 3 लक्षणे दिसतायत? हार्टसाठी धोक्याचा इशारा असू शकतो!

Chest pain reasons at night

|

Sakal

येथे क्लिक करा