Aarti Badade
आयुर्वेदानुसार, पित्त दोष हा अग्नी आणि पाणी या घटकांपासून बनलेला असतो. हा दोष शरीरातील पचनक्रिया, चयापचय आणि हार्मोनल संतुलन नियंत्रित करतो.
Pitta dosha symptoms
sakal
वारंवार पोटात जळजळ, छातीत जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर हे पित्त वाढल्याचे मुख्य लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
Pitta dosha symptoms
Sakal
खूप जास्त घाम येतो आणि घामाला उग्र वास येतो. शरीरातील पित्त वाढल्यामुळे शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे सतत घाम येतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
Pitta dosha symptoms
Sakal
भूक लागणे चांगले असले तरी, जेवल्यानंतर लगेच पुन्हा भूक लागणे किंवा खूप जास्त भूक लागणे हे पित्त दोषाचे लक्षण आहे. हे पचनसंस्थेतील बिघाड दर्शवते.
Pitta dosha symptoms
Sakal
जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढते. यामुळे चेहऱ्यावर लाल चट्टे उठणे, वारंवार मुरुमे किंवा पुरळ येणे यांसारख्या समस्या जाणवतात.
Pitta dosha symptoms
Sakal
तोंडाची स्वच्छता ठेवूनही जर सतत तोंडाचा वास येत असेल, तर हे शरीरातील वाढलेल्या पित्त दोषाचे संकेत असू शकतात. पचनातील उष्णतेमुळे असे घडते.
Pitta dosha symptoms
Sakal
रोज सकाळी एक चमचा बडीशेप आणि धणे यांचे पाणी प्या.आहारात काकडी आणि डाळिंब यांसारख्या थंड फळांचा समावेश करा.मीठ न टाकता ताक पिणे पित्त शमवण्यासाठी सर्वोत्तम आहे.
Pitta dosha symptoms
sakal
जंक फूड आणि अतिमसालेदार पदार्थांपासून लांब राहा. नियमित व्यायाम करा आणि पुरेसे पाणी प्या. पित्ताचा त्रास जास्त असल्यास आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
Pitta dosha symptoms
sakal
Kidney stone prevention
Sakal