Aarti Badade
कधी कधी जीवनात घडलेल्या नकारात्मक घटनांमुळे मन अस्थिर होतं – ही मानसिक आघाताची सुरुवात असू शकते.
वाईट घटनेनंतर सतत दुःख, अपराधीपणा किंवा भीती वाटत असेल तर ते मानसिक आघाताचे संकेत असू शकतात.
वाईट प्रसंग घडूनही "हे खरं नाही" असं वाटत असल्यास, ती मानसिक अस्थैर्याची सुरुवात असते.
ज्यांना मानसिक आघात झाला आहे, त्या व्यक्ती सतत विचार करत असतात – ते रागावलेले आणि घाबरलेलेही असतात.
झोप नीट लागत नसेल, भयंकर स्वप्ने येत असतील – तर तुमचं मन अजूनही त्या घटनेपासून सावरलेलं नाही.
मन सुन्न होणं, निर्णय घेण्यास कठीण जाणं, आणि समाजापासून अलिप्त राहणं हे मानसिक आघाताची चिन्हं असतात.
मानसिक आघाताचा परिणाम शरीरावरही होतो. शरीर सुन्न होणं, डोकेदुखी, उलटी, थकवा जाणवतो.
सतत चिडचिड, निराशा, कामावर लक्ष नसणे, आणि एकटं राहण्याची इच्छा ही गंभीर लक्षणं आहेत.
ही लक्षणं जाणवत असल्यास डॉक्टरांची मदत घ्या.