Aarti Badade
महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे टीव्हीवर दाखवतात तशी अचानक छातीत जोरात दुखणारी नसतात. ती खूप हलकी आणि हळूहळू दिसू लागतात, ज्यामुळे ती दुर्लक्षित होतात.
Female Heart Attack Symptoms
Heart
पहिले आणि मुख्य लक्षण म्हणजे खूप थकवा किंवा कमजोरी. कोणतेही मोठे काम न करता किंवा आराम केल्यानंतरही कमजोरी वाटत असेल, तर हा हृदयाशी संबंधित इशारा असू शकतो.
Female Heart Attack Symptoms
Sakal
दुसरे लक्षण म्हणजे धाप लागणे किंवा चक्कर येणे. मेहनत न करतादेखील धाप लागणे हे हृदयाला पुरेसे ऑक्सिजन न मिळण्याचे किंवा कमजोरीचे चिन्ह नसून, हृदयाच्या समस्येचे संकेत असू शकते.
Female Heart Attack Symptoms
Sakal
तिसरे लक्षण म्हणजे छातीऐवजी जबडा, मान, पाठ, खांदा किंवा हात या भागांमध्ये कारण न समजणारी दुखापत किंवा जडपणा जाणवणे, हे देखील हार्ट अटॅकचे संकेत असू शकते.
Female Heart Attack Symptoms
Sakal
चौथे लक्षण म्हणजे पोटात जडपणा, मळमळ, उलटीसारखे किंवा ऍसिडिटीसारखे वाटणे. हे केवळ गॅस नाही, तर हार्ट अटॅकच्या वेळीही अशी लक्षणे दिसू शकतात.
Female Heart Attack Symptoms
Sakal
पाचवे लक्षण म्हणजे अचानक घाम येणे, त्वचा चिकट होणे किंवा कारण नसताना घाबरल्यासारखे (बेचैन) वाटणे. ही सर्व हार्ट अटॅकची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.
Female Heart Attack Symptoms
Sakal
अनेक महिलांना सायलेंट हार्ट अटॅक (स्पष्ट लक्षणे नसलेला अटॅक) येतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ही हलकी लक्षणे ताण किंवा कमजोरी न समजता वेळेवर तपासा—दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
Female Heart Attack Symptoms
Sakal
Sakal