Saisimran Ghashi
साइलेंट हार्ट अटॅक (Silent Heart Attack) म्हणजे हार्ट अटॅकची अशी स्थिती जिचे लक्षणे स्पष्टपणे जाणवत नाहीत किंवा ती सामान्य त्रासासारखी वाटतात.
तीव्र वेदना नसूनही छातीत थोडी जळजळ, दडपण किंवा चिरडल्यासारखे वाटू शकते.
कोणतीही मोठी शारीरिक हालचाल न करता दम लागणे हे हृदयाच्या त्रासाचे लक्षण असू शकते.
अपचन, उलटीसारखे वाटणे किंवा पोटात जडपणा, ही लक्षणे देखील हृदयविकाराशी संबंधित असू शकतात.
पुरेसा आराम करूनही सतत थकवा जाणवणे, विशेषतः सामान्य हालचालींनंतरही.
ही वेदना सतत नसून मधूनमधून जाणवू शकते.
थंडी असतानाही घाम येणे, अशक्तपणा वाटणे किंवा चक्कर येणे ही लक्षणे दुर्लक्ष करू नयेत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.