Aarti Badade
बाहेरून न दिसणारा पण मनात साचत जाणारा 'सायलेंट स्ट्रेस' हा वाढत्या वयात स्मरणशक्ती कमी होण्यामागचा सर्वात मोठा आणि धोकादायक घटक ठरत आहे.
Silent stress impact on memory
Sakal
दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने शरीरात 'कॉर्टिसोल' नावाच्या ताण-हॉर्मोनचे प्रमाण वाढते, जे मेंदूच्या स्मरणशक्ती आणि शिकण्याशी संबंधित भागावर गंभीर परिणाम करते.
Silent stress impact on memory
Sakal
या अदृश्य ताणामुळे गोष्टी पटकन विसरणे, कामात लक्ष न लागणे आणि निर्णय घेताना गोंधळ होणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात.
Silent stress impact on memory
Sakal
वृद्धांमध्ये जाणवणारा एकटेपणा आणि सामाजिक दुरावा हा सायलेंट स्ट्रेस वाढवण्यास कारणीभूत ठरतो, ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो.
Silent stress impact on memory
Sakal
तज्ज्ञांच्या मते, या ताणाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात डिमेंशिया (स्मृतीभ्रंश) सारख्या गंभीर विकारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Silent stress impact on memory
Sakal
नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ध्यान-धारणा केल्याने ताण कमी होऊन मेंदू निरोगी राहण्यास मदत होते.
Silent stress impact on memory
Sakal
कुटुंबीय आणि मित्रांसोबत नियमित संवाद ठेवल्याने मानसिक दडपण कमी होते; वाढत्या वयात 'मानसिक आरोग्य' जपणे हीच खरी आरोग्य गुंतवणूक आहे.
Silent stress impact on memory
Sakal
Cervical cancer symptoms
Sakal