मुलांची जंकफूडची सवय दूर करण्यासाठी पालकांसाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स

Anushka Tapshalkar

जंकफूड

जंकफूडमध्ये फॅट, साखर व मीठ जास्त असते; त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार व दातकिड वाढते.

जंकफूडची सवय नको

मुलांना लहानपणापासून जंकफूडची सवय लावू नका; घरचे पौष्टिक अन्न देण्यावर भर द्या.

शांतपणे सांगा

मुलांवर ओरडू नका किंवा बळजबरीने खाऊ घालू नका; शांतपणे समजावून सांगा.

आरोग्यदायी पर्याय

घरी जंकफूड आणणे टाळा; आरोग्यदायी पर्याय नेहमी उपलब्ध ठेवा.

पालकांनी टाळा

पालकांनी स्वतः जंकफूड टाळा; मुलांसाठी रोलमॉडेल बना.

आकर्षक आरोग्यदायी अन्न

आरोग्यदायी अन्नाची चव बदलून आकर्षक बनवा; रोज स्नॅक्स देणे बंद करा.

स्वयंपाकात सहभाग

किचनमध्ये स्वयंपाक करताना मुलांना सहभागी करा; अन्नाबद्दल आवड वाढते.

संतुलित आहार

भाजी-भात, चपाती, फळे, दूध, अंडी, डोसा-इडली असा संतुलित आहार द्या.

Balanced Diet | sakal

ध्यान करताना डोक्यात विचारांची गर्दी होतेय? कदाचित तुम्ही करताय ‘या’ चुका

Meditation Mistakes People Commonly Make

|

sakal

आणखी वाचा