सकाळ डिजिटल टीम
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहाने समृद्ध आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. मटण, मासे, अंडे, सुकामेवा, बीट, पालक आणि ब्रोकोली सारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन C
व्हिटॅमिन C लोहाच्या शोषणात मदत करतो. द्राक्षे, संत्री, लिंबू, आंबा, आणि किवी यांसारख्या फळांचा वापर करा. व्हिटॅमिन Cच्या सेवनामुळे शरीर लोह अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते.
फॉलिक अॅसिडची
फॉलिक अॅसिड किंवा फोलेट हे शरीरात लोह निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. पालक, तांदूळ, शेंगदाणे, चवळी, राजमा आणि अॅवोकॅडो यांसारख्या पदार्थांचा वापर करा.
पाणी प्या
पुरेसे पाणी पिणे हे शरीरातील संपूर्ण आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. हायड्रेटेड राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.
व्यायाम करा
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते आणि रक्ताची गती सुधरते. त्यामुळे लाल रक्तपेशींचा उत्पादन होतो, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत मिळते.
मध
मध हे शरीराला ऊर्जादेखील प्रदान करतात आणि हळूहळू हिमोग्लोबिन वाढवू शकतात. दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरावर चांगले फायदे होतात.
चहा आणि कॉफी
चहा आणि कॉफीमध्ये उपस्थित असलेला कॅफीन लोहाच्या शोषणामध्ये अडथळा आणू शकतो. म्हणून यांचा वापर कमी करणे आणि लोहयुक्त पदार्थांचा वापर जास्त करणे उपयुक्त ठरते.
सुकामेवा खा
सुकामेव्यातील अंजीर, बदाम, खारीक, आणि काळ्या मनुका यासारखे ड्रायफ्रुट्स लोहाचे उत्तम स्त्रोत आहेत. रोज एक मुठभर सुकामेवा सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होईल.