सकाळ वृत्तसेवा
सत्तू हे एक पीठ आहे, जे कोरड्या भाजलेल्या डाळी आणि तृणधान्यांपासून बनवले जाते. हे पीठ प्रामुख्याने नेपाळ, भारत, तिबेट आणि पाकिस्तानमध्ये वापरले जाते.
सत्तू पीठात लोह, मॅंगनीज, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम यासारखी महत्त्वाची पोषणतत्त्वे असतात, जी शरीराला आवश्यक असतात आणि एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
सत्तूच्या पीठाचे सरबत शरीराला ताजेतवाने करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सत्तूचा वापर फार उपयुक्त आहे. सत्तू पीठाचे सरबत प्यायल्यामुळे शरीर थंड राहते.
सत्तू पीठ पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत करते. बध्दकोष्ठता, ॲसिडीटी, आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित सत्तूचा उपयोग करा.
सत्तू पीठ सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवता येते. हे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करते आणि त्यामुळे अधिक प्रमाणात कॅलोरी बर्न होतात.
सत्तूमध्ये असलेल्या फायबर्समुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सत्तू पीठ यकृतासाठी फायदेशीर असते. यामुळे यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि डिटॉक्सिफिकेशन मदत होते.
सत्तूच्या पीठाचे सरबत आपल्या शरीराला ताजेतवाने बनवते आणि त्याची चव अप्रतिम असते.