Pranali Kodre
आपल्याला, रोजच अनेक भूमिका पार पाडाव्या लागत असल्याने दिवसभर एनर्जीटिक आणि फ्रेश राहणे खूप गरजेचे असते. हे आपल्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवरही अवलंबून असते.
घाईगडबडीत उठण्याऐवजी नेहमीच्या वेळेपेक्षा किमान तीस मिनिटे लवकर उठा, म्हणजे स्वतःसाठी वेळ मिळेल. हा वेळ ध्यान, प्रार्थना, साधे स्ट्रेचिंग किंवा शांतपणे फक्त एका चहाचा कप घेण्यासाठी वापरा.
पडदे उघडा, बाल्कनीत जा. नैसर्गिक प्रकाश शरीराच्या अंतर्गत घड्याळाला संतुलित करतो आणि मूड चांगला करतो.
प्रथिने (प्रोटीन) आणि संपूर्ण धान्ये (होल ग्रेन) असलेला पौष्टिक नाश्ता करा. उदा., ओटमील, अंडी, डाळ, भाज्यांचा पराठा, एक फळ.
एकदम खूप खाण्यापेक्षा दर तीन-चार तासांनी थोडे थोडे खाण्याने शरीराची ऊर्जा पातळी स्थिर राहते.
हायड्रेशन हे फ्रेश राहण्याचे रहस्य आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या. थकवा, डोकेदुखी आणि स्नायूंचे आखडणे यासाठी पाण्याची कमतरता हे एक प्रमुख कारण आहे.
सोडा, एनर्जी ड्रिंक्स, प्रोसेस्ड स्नॅक्स यामुळे तात्पुरती ऊर्जा येते; परंतु नंतर ती झपाट्याने खाली उतरते आणि थकवा येतो.
शक्य असेल तर सकाळी २०-३० मिनिटे जॉगिंग, ॲरोबिक्स, योगासने किंवा नृत्य करा. यामुळे शरीरात एन्डोर्फिन हार्मोन स्रवते, ज्यामुळे मूड फ्रेश होतो. डेस्क जॉब असेल तर दर तासाला ५ मिनिटे उभे राहा, ऑफिसमध्ये फिरा, स्ट्रेचिंग करा.
दिवसभरातून काही वेळ स्वतःसाठी काढा. तुमचे आवडते संगीत ऐका, १० मिनिटे डोळे मिटून बसा, कोणाशी तरी हलक्याफुलक्या गप्पा मारा.
रात्री सात-आठ तास चांगली, गाढ झोप घेणे सर्वांत महत्त्वाचे. झोपेच्या आधी मोबाईल, टॅबलेट वापरणे टाळा.
अचानक थकवा येतो आणि तुम्हाला लगेच फ्रेश वाटण्याची इच्छा होते, तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा.