मानसिक शांती मिळवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Monika Shinde

मानसिक काळजी घेणं

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक थकवा, चिंता, आणि तणाव वाढले आहेत. यामुळे जीवनाच्या प्रत्येक अंगावर परिणाम होतो. त्यामुळे स्वतःची मानसिक काळजी घेणं आवश्यक आहे.

थकवा कमी करण्यासाठी

तणाव, चिंता आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी काही साधे आणि प्रभावी उपाय

ध्यान आणि प्राणायाम करा

दैनिक ५-१० मिनिटे शांतपणे ध्यान करा. हे तणाव कमी करण्यास मदत करेल.

सकारात्मक विचार करा

नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार मनाशी ठरवा. "मी सक्षम आहे" असे स्वतःला सांगा.

संपूर्ण विश्रांती घ्या

योग्य झोप आणि विश्रांती घ्या. मानसिक शांतीसाठी ७-८ तासांची झोप आवश्यक आहे.

भावना व्यक्त करा

तुमच्या भावना मित्रांशी किंवा कुटुंबाशी शेअर करा. हे तुमचं मन हलकं करेल.

स्वतःसाठी वेळ घ्या

दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. पुस्तक वाचणे किंवा चालायला जाणे यामुळे ताजेतवाने व्हाल.

व्यायाम करा

सतत व्यायाम करा. यामुळे मानसिक थकवा कमी होतो आणि आनंद मिळतो.

टीसी आणि टीटी मधील फरक काय?

आणखी वाचा