Aarti Badade
चालणे हा सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तो फायदेशीर आहे, पण दररोज करण्याची सवय कशी लावायची? या टिप्स मदत करतील.
पहिल्याच दिवशी १०,००० पावले चालण्याचा हट्ट करू नका. दररोज १५-२० मिनिटे चालण्याचं ध्येय ठेवा.
एक वेळ ठरवा आणि चालण्याला एक न चुकवता येणारी ‘भेट’ समजा.
मित्र किंवा कुटुंबासोबत फिरल्याने चालणे मजेदार होतं आणि कंटाळा येत नाही.
आवडती प्लेलिस्ट किंवा पॉडकास्ट ऐकत चालल्यास वेळ कसा जातो कळत नाही.
स्टेप ट्रॅकर किंवा वॉकिंग अॅप वापरल्याने प्रगती दिसते आणि प्रेरणा मिळते.
आरामदायी कपडे व चांगले बूट घातल्याने चालण्याचा आनंद वाढतो.
उद्यान, समुद्रकिनारा किंवा मॉलमध्ये फिरल्याने रोजच्या चालण्यात बदल येतो.
बूट दाराजवळ दिसले की चालायला जाण्याची आठवण राहते.