Aarti Badade
आजकाल केवळ चाळिशीनंतरच नाही, तर विशी-पंचविशीतील तरुणांमध्येही व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास वाढताना दिसत आहे. रक्ताभिसरणात अडथळा आल्याने पायांच्या नसा फुगतात.
Simple Tips to Reduce Varicose Veins Pain and Swelling.
Sakal
जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स असतील, तर बराच वेळ पाय खाली सोडून बसणे टाळा. यामुळे रक्ताचा प्रवाह पायांकडे साठतो आणि त्रास वाढतो. बसताना पायाखाली स्टूल किंवा उशी ठेवा.
Simple Tips to Reduce Varicose Veins Pain and Swelling.
Sakal
एकाच जागी बराच वेळ उभे राहिल्याने नसांवर ताण येतो. तुमचे काम उभे राहून करण्याचे असेल, तर मध्येच थोडी हालचाल करा. पायाच्या बोटांची हालचाल फायद्याचे ठरते.
Simple Tips to Reduce Varicose Veins Pain and Swelling.
Sakal
जास्त वेळ मांडी घालून बसल्याने पायांच्या नसांवर दाब येतो आणि रक्ताभिसरण मंदावते. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असलेल्यांनी मांडी घालून किंवा पायावर पाय चढवून बसणे टाळावे.
Simple Tips to Reduce Varicose Veins Pain and Swelling.
Sakal
दिवसातून किमान दोनदा पायाचे हलके व्यायाम करा. झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे पाय भिंतीला टेकवून उंचावर ठेवा. यामुळे साठलेले रक्त पुन्हा हृदयाकडे प्रवाहित होण्यास मदत होते.
Simple Tips to Reduce Varicose Veins Pain and Swelling.
Sakal
काम करताना बसल्या जागी सुद्धा तुम्ही पायाचे पंजे गोलाकार फिरवू शकता किंवा बोटे हलवू शकता. यामुळे पायांमधील जडपणा कमी होतो आणि वेदना थांबतात.
Simple Tips to Reduce Varicose Veins Pain and Swelling.
Sakal
व्हेरिकोज व्हेन्सकडे दुर्लक्ष करू नका. हे ३ साधे नियम पाळले तर शस्त्रक्रियेशिवायही हा त्रास नियंत्रणात ठेवता येतो. जर वेदना जास्त असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Simple Tips to Reduce Varicose Veins Pain and Swelling.
Sakal
Dandruff home remedies
Sakal