Anushka Tapshalkar
आज स्क्रीन सर्वत्र आहेत. पण थोडेसे शहाणपण आणि छोट्या सवयींमुळे तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता.
चित्रकला, स्वयंपाक, हस्तकला किंवा इतर कोणताही छंद जोपासा. हे सगळं तुम्हाला स्क्रीनपासून दूर ठेवू शकतं.
मित्रांना मेसेज करण्याऐवजी त्यांना थेट कॉल करा. संवाद जास्त खराखुरा वाटतो.
खाण्याच्या वेळेस मोबाईल, टीव्ही दूर ठेवा. कुटुंबीयांसोबत बोला, हसा, एकमेकांशी संवाद साधा.
संपूर्ण आठवड्याचे नाही जमले, तरी शनिवार-रविवार स्क्रोल न करता घालवा. मन जास्त शांत आणि ताजेतवाने वाटेल.
फक्त स्क्रीनवर किती वेळ घालवतोय हे महत्त्वाचं नाही. त्याऐवजी स्क्रीनशिवाय काय अर्थपूर्ण करता येईल याकडे लक्ष द्या.
मोबाईल थोडा दूर ठेवा. गरज नसलेले नोटिफिकेशन बंद करा.
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल आणि इतर उपकरणांपासून दूर रहा. त्याऐवजी पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका.