संतोष कानडे
मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवरायांचे जगातील एकमेव मंदिर आहे. येथे महाराजांची पूजा केली जाते.
येथील मूर्तीमध्ये महाराजांना दाढी नाही. या मूर्तीला शिवराजेश्वर म्हटलं जातं. शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांनी १६९५ मध्ये ही मूर्ती तयार करुन घेतली होती.
शिवरायांची ही मूर्ती साधुवेशातील असल्याचं सांगितलं जातं. महाराज सिंहासनावर बसलेले नसून नावेवर बसलेल्या स्थितीत आहेत.
१६६६ मध्ये महाराजांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा त्यांनी दाढी, मिशा काढून वेशांतर केलं होतं, असे ऐतिहासिक संदर्भ आहेत.
शिवरायांना मुघलांच्या मुलुखातून प्रवास करायचा होता त्यामुळे त्यांनी आपली ओखळ लपवली होती. जेधे शकावली आणि शिवभारत ग्रंथांमध्ये या नोंदी आहेत.
राजाराम महाराजांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं तेव्हा त्यांनी याच वेशातील महाराजांची मूर्ती बनवली, असं काही इतिहासकार सांगतात.
असंही म्हटलं जातं की, राजाराम महाराजांनी बालपणी जसे महाराज बघितले होते तसेच त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला.
काही कथांनुसार, राज्याभिषेकावेळी महाराजांनी दाढी काढलेली होती. वेदमंत्रोच्चारात तो सोहळा संपन्न झालेला होता. त्यामुळे ही मूर्ती इंद्रदेवांच्या रुपातील असल्याचं सांगितलं जातं.
सिंधुदर्ग किल्ल्यातील ही मूर्ती यौद्ध्याच्या रुपाऐवजी स्थिप्रज्ञ आणि मुत्सुद्दी रुपाचे दर्शन घडवते. अशी मूर्ती इतरत्र कुठेही नाही. काळानुरुप या मूर्तीला रंगकाम करुन दाढी, मिशा काढण्यात आलेले आहेत.