शेतमजुरी ते पोलीस अधिकारी, नंतर उभा केलं ड्रग्ज तस्करीचं साम्राज्य; ड्रग लॉर्ड El Mencho कोण?

सूरज यादव

एल मेंचो

मेक्सिकोत सुरक्षादलाने राबवलेल्या लष्करी मोहिमेत जगातील सर्वात वॉन्टेड असा ड्रग्ज तस्कर एल मेंचो ठार झाला. त्याचं नाव नेमेसियो रुबन ओसेगुएरा सर्वेंट्स असं आहे.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

मेक्सिकोत हिंसाचार

एल मेंचोच्या मृत्यूनंतर मेक्सिकोसह अनेक राज्यात हिंसा भडकली आहे. ड्रग कार्टेलचा बॉस असणारा एल मेंचो एकेकाळी पोलीस अधिकारी होता.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

तस्करीचा आरोप

अमेरिकेनं एल मेंचोवर १५ मिलियन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. अमेरिकेत धोकादायक असं फेंटानिल आणि अंमली पदार्थ तस्करी तो करत असल्याचा आरोप होता.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

शेतात मजुरी

अफू, गांजा, मारिजुआनाची शेती जिथं सामान्य मानली जाते त्या मिचोआकनमध्ये एल मेंचोचा जन्म झाला होता. लहानपणी मेंचो शेतात मजुरी करायचा.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

हेरॉइन तस्करी

मिचोआकन इथून एल मेंचो अमेरिकेत गेला. पण तिथं त्याला हेरॉइन तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं होतं.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

तुरुंग ते पोलीस

तुरुंगातून सुटल्यानंतर एल मेंचोला मेक्सिकोत परत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर एल मेंचो पोलिसात भरती झाला. पण काही दिवसातच त्यानं थेट गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकलं.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

ड्रग्ज तस्करी

पोलीस दलात कार्यरत असणारा एल मेंचो ड्रग्ज तस्करीकडे वळला आणि त्यानं बलाढ्य अशी गुन्हेगारी संघटना जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल उभा केली.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

पोलिसांची हत्या

२०१५ मध्ये एल मेंचोने त्याला पकडण्यासाठी आलेलं लष्कराचं हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यानंतर त्याच वर्षी इशारा म्हणून ६ आठवड्यात २० पेक्षा जास्त पोलिसांची हत्या केली होती.

el mencho drug cartel mexico

|

Esakal

रेल्वे रुळांमध्ये अंतर का आणि किती असते? ९९ टक्के लोकांना उत्तर माहित नाही

Reason for gaps in railway tracks

|

ESakal

इथं क्लिक करा