सूरज यादव
सिंगापूरमध्ये मंत्र्यांच्या वेतनात १५ वर्षांनी वाढ करण्यात आलीय. जगात सर्वाधिक वेतन मिळणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
Singapore PM
पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी वेतनात बदल केला नाही तर राजकारणात प्रतिभावंतांना आणणं कठीण होईल असं म्हटलंय.
Singapore PM
कनिष्ठ मंत्र्यांना वार्षिक वेतन ११ लाख सिंगापूर डॉलरवरून १८ लाख सिंगापूर डॉलर करण्यात आलंय. भारतीय चलनानुसार वर्षाला १३ कोटी ५४ लाख रुपये इतकं आहे.
Singapore PM
पंतप्रधानांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली आहे. २२ लाखांवरून ३६ लाख सिंगापूर डॉलर वेतन केलं आहे.
Singapore
भारतीय चलनानुसार सिंगापूरच्या पंतप्रधानांना जवळपास २७ कोटी रुपये इतकं वेतन मिळणार आहे. महिन्याला सव्वा दोन कोटी इतकं वेतन मिळेल.
Singapore PM
सिंगापूरमध्ये कनिष्ठ मंत्र्यांच्या वेतनात होणारी वाढ ही त्यांची कामगिरी आणि जबाबदारी यावर अवलंबून असेल असंही पंतप्रधानांनी सांगितलंय.
Singapore PM
सिंगापूरमध्ये राजकीय पदांवर कार्यरत असलेल्यांना मिळणारं वेतन हे संवेदनशील मुद्दा आहे. मंत्र्यांचं वेतन हे सामान्य नागरिकांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.
Singapore PM
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातून सक्षम लोकांनी राजकारणात येण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी जास्त वेतन गरजेचं असल्याचं सरकार सांगते.
Singapore PM
Octopus
Esakal