Aarti Badade
पुणे शहरापासून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक सिंहगड किल्ला दिमाखात उभा आहे.
Sinhagad Fort age history
Sakal
समुद्रसपाटीपासून सुमारे १,३१२ मीटर उंच असलेला सिंहगड त्याच्या उंच कड्यांसह निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे.
Sinhagad Fort age history
Sakal
सिंहगडावरील ट्रेकदरम्यान सह्याद्रीच्या डोंगररांगांचे मनमोहक दृश्य अनुभवता येत असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते.
Sinhagad Fort age history
Sakal
किल्ल्याची रचना डोंगराच्या नैसर्गिक उतार-पठारानुसार अनियमित, लांबट त्रिकोण किंवा उलथलेल्या पाचरसारखी दिसते.
Sinhagad Fort age history
sakal
सिंहगडाचे जुने नाव ‘कोंढाणा’ असून हा किल्ला मराठ्यांच्या लष्करी रणनीती आणि शौर्याचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानला जातो.
Sinhagad Fort age history
Sakal
इ.स. १६७० मध्ये तानाजी मालुसरे यांनी प्राणांची बाजी लावत कोंढाणा किल्ला जिंकला आणि या लढाईने इतिहासात अजरामर स्थान मिळवले.
Sinhagad Fort age history
Sakal
उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार, किल्ल्याचा इतिहास २,००० वर्षांहून अधिक जुना असून त्याचा संबंध सातवाहन काळाशी जोडला जातो.
Sinhagad Fort age history
Sakal
प्राचीन कोरीव काम आणि गुहेसदृश रचनांवरून किल्ल्याची निर्मिती इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्या आसपास झाली असावी, असे मानले जाते.
Sinhagad Fort age history
Sakal
इतिहास, शौर्य, वास्तुरचना आणि सह्याद्रीचे सौंदर्य यांचा अनोखा संगम असलेला सिंहगड आजही इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण ठरतो.
Sinhagad Fort age history
sakal
Cardamom After Meals
Sakal