Aarti Badade
पावसाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. गुळातील पोषक तत्वे शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
गुळामध्ये झिंक आणि सेलेनियम सारखे घटक असल्याने, ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
गुळाचा चहा शरीराला उष्णता देतो, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या सामान्य समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
गुळात नैसर्गिक साखर असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. पावसाळ्यात थकवा जाणवत असल्यास गुळाचा चहा फायदेशीर ठरतो.
गुळात असलेले क्रोमियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
गुळाचा चहा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास (डिटॉक्स) मदत करतो आणि चयापचय क्रिया सुधारून वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतो.
गुळाचा चहा ऍसिडिटीची समस्या कमी करण्यास मदत करतो. टीप: गुळाचा चहा मर्यादित प्रमाणात प्यावा, कारण जास्त गुळामुळे शरीरात उष्णता वाढू शकते.