Swadesh Ghanekar
महान ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत १०० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे
ब्लॅकहेल्थ विरुद्ध लिटगो यांच्यातल्या १९३१ साली झालेल्या या सामन्यात ब्रॅडमन यांनी हा विक्रम केला होता.
सर डॉन ब्रॅडमन तेव्हा २३ वर्षांचे होते आणि त्यांनी ब्लॅकहेल्थचे प्रतिनिधित्व करताना १८ मिनिटांत १०० धावा केल्या होत्या.
तेव्हा एक षटक ८ चेंडूंचे असायचे आणि ब्रॅडमन यांनी ३ षटकांत शतक पूर्ण केले
ब्रॅडमन यांनी पहिल्या षटकात ६,६,४,२,४,४,६,१ अशा ३३ धावा चोपल्या.
हॉकी बेकरच्या दुसऱ्या षटाकत ६,४,४,६,६,४,६,४ अशा ४० धावा ब्रॅडमन यांनी झोडल्या.
ब्लॅक यांची पुन्हा धुलाई करताना ब्रॅडमन यांनी तिसऱ्या षटकात २९ धावा अशा १०२ धावा ३ षटकांत पूर्ण केल्या.
ब्रॅडमन यांनी त्या सामन्यात १४ षटकार व २९ चौकारांसह २५६ धावांची खेळी केली.