बॉलिवूड अभिनेत्रीसोबत सर गॅरी सोबर्स यांचा झालेला साखरपुडा का मोडला? कोण होती ती?

सकाळ डिजिटल टीम

गाजलेले प्रेम..

अंजू महेंद्रू आणि महान क्रिकेटपटू सर गारफिल्ड "गॅरी" सोबर्स यांचे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात एक अतिशय गाजलेले प्रेमप्रकरण होते.

Gary Sobers and Anju Mahendru love story

|

esakal

भारत दौरा अन्...

वेस्ट इंडिजचा संघ १९६६ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला असताना सर गॅरी सोबर्स आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांची पहिली भेट झाली.

Gary Sobers and Anju Mahendru love story

|

esakal

१७ वर्षांची मॉडेल

त्यावेळी अंजू महेंद्रू अवघ्या १७ वर्षांच्या मॉडेल आणि अभिनेत्री होत्या, तर गॅरी सोबर्स ३० वर्षांचे वेस्ट इंडिजचे कर्णधार होते.

Gary Sobers and Anju Mahendru love story

|

esakal

मुंबईत साखरपुडा

जानेवारी १९६७ मध्ये मुंबईत त्यांच्या घरी गॅरी सोबर्स यांनी अंजू यांना मागणी घातली. त्यानंतर एका भव्य पार्टीत त्यांचा साखरपुडा झाला.

Gary Sobers and Anju Mahendru love story

|

esakal

राजेश खन्ना

गॅरी सोबर्स यांना भेटण्यापूर्वी अंजू महेंद्रू यांचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत प्रेमसंबंध होते.

Gary Sobers and Anju Mahendru love story

वाद अन्...

राजेश खन्ना यांच्याशी झालेल्या एका मोठ्या वादानंतर अंजू गॅरी सोबर्स यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या.

Gary Sobers and Anju Mahendru love story

साखरपुडा मोडला

नंतर राजेश खन्ना यांच्याशी पुन्हा जवळीक निर्माण झाल्यामुळे त्यांनी राजेश खन्ना यांच्या घरातूनच फोन करून गॅरी सोबर्स यांच्यासोबतचा साखरपुडा मोडला.

Gary Sobers and Anju Mahendru love story

करिअरमध्ये व्यस्त

गॅरी सोबर्स यांच्या क्रिकेट दौऱ्यांमुळे आणि इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमुळे दोघांमध्ये खूप अंतर होते. दोघेही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त होते.

Gary Sobers and Anju Mahendru love story

लग्नाची परवानगी

साखरपुडा मोडल्यानंतरही त्यांच्यात कटुता आली नाही. १९६९ मध्ये गॅरी सोबर्स यांनी ऑस्ट्रेलियन प्रेयसी प्रुडन्स किर्बी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी अंजू महेंद्रू यांना पत्र लिहून रीतसर परवानगी मागितली होती.

Gary Sobers and Anju Mahendru love story

FIFA World Cup मध्ये पुरुष खेळाडू 'काळ्या रंगाची ब्रा' का घालतात? जाणून घ्या कारण

Male football players wear black bra

|

ESakal

येथे क्लिक करा