Anushka Tapshalkar
१० तासाहून अधिक वेळ बसून राहणे केवळ शरीराच्या वेदनाच नाही वाढवत, तर त्यामुले हृदयविकाराचा आणि मृत्यूचाही धोका वाढतो.
सर्वात वाईट म्हणजे आपल्यापैकी अनेकांना नुकसान झाल्यावरच उशिरा त्याची जाणीव होते.
परंतु योग्य उपाय अवलंबल्याने हे टाळता येऊ शकते. जे लोक १० तासापेक्षा जास्त वेळ बसून असतात खास त्यांच्यासाठी पुढे काही व्यायाम सांगितले आहेत. ते केल्यास आरोग्यविषयक धोके टाळता येऊ शकतात.
Neck Stretch मध्ये हात पाठीमागे नेऊन एका बाजूला ठेवा आणि मानेला ताण द्या. असे प्रत्येक बाजूला या १० वेळा रिपीट करा.
Side आणि Back Stretch करण्यासाठी खुर्चीच्या कडेवर बसा, एक पाय दुसऱ्या पायावर ठेवा आणि पुढे झुका. २ सेकंद धरून ठेवा आणि परत सरळ व्हा.
Lower Back Stretch करताना सरळ बसा आणि गुडघा छातीजवळ ओढा.
Shoulder Stretch करताना सरळ बसा आणि खांदे मागे फिरवा, खांद्याच्या पट्ट्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. १०-२० वेळा करा.