Anushka Tapshalkar
कानातील मळ (Earwax/कर्णमळ) हे कानात नैसर्गिकरित्या तयार होणारं एक संरक्षणात्मक पदार्थ आहे. ते धूळ, बॅक्टेरिया आणि कीटकांपासून कानाचे संरक्षण करतं.
थोडकं मळ आवश्यक असतं, पण ते जास्त प्रमाणात साठल्यास समस्या निर्माण होतात.
काही संशोधनानुसार, जर मळ खूप वाढला असेल तर तो एका विशिष्ट मज्जासंस्थेवर (nerve) दाब देतो. हीच मज्जा पोटाशी जोडलेली असल्यामुळे काही वेळा भूख अनावर होण्याची शक्यता असते.
जास्त मळामुळे कान बंद होऊ शकतो, आवाज अस्पष्ट ऐकू येतो किंवा बहिरेपणा जाणवतो.
कानात दाब जाणवल्यास डोकेदुखी, चक्कर येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
काही लहान मुलांमध्ये अन्न खाण्याचं नियंत्रण राहात नाही आणि मुळाशी कानातील मळ असू शकतो.
सुई, पिन किंवा कानात वाटीने मळ काढणं टाळावं. यामुळे कानाला इजा होऊ शकते.
दर ६ ते १२ महिन्यांनी ENT तज्ज्ञांकडून कान तपासून घ्यावेत. आवश्यक असल्यास ते योग्य प्रकारे मळ काढून देतील.