तुमची ‘ही’ एक सवय शरीरासाठी सिगारेटइतकीच घातक!

Aarti Badade

बसून राहण्याची घातक सवय

काम किंवा मोबाईलमुळे आपण तासनतास एकाच जागी बसून राहतो. संशोधनानुसार, दिवसाला ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहणे हे धूम्रपानाइतकेच जीवघेणे ठरू शकते.

Dangers of sitting for long hours

|

Sakal

पेशींच्या आरोग्यावर परिणाम

सतत बसून राहिल्याने शरीरातील मेटाबॉलिझम मंदावते आणि पेशींच्या टेलोमीअर्सची लांबी वेगाने कमी होते. यामुळे तुम्ही वयापेक्षा जास्त वृद्ध दिसू लागता.

Dangers of sitting for long hours

|

Sakal

५ तासांची झोप पुरेशी नाही!

व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकजण फक्त ५ तास झोपतात. मात्र, पुरेशी झोप न मिळाल्यास शरीराची स्वतःला दुरुस्त करण्याची प्रक्रिया थांबते आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडते.

Dangers of sitting for long hours

|

Sakal

वाढत्या तणावाचा त्वचेवर परिणाम

सतत तणावात राहिल्यामुळे शरीरात 'कोर्टिसोल' हार्मोन वाढते. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर, हृदयावर आणि पचनसंस्थेवर होतो, ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो.

Dangers of sitting for long hours

|

Sakal

साखर आणि सुरकुत्यांचे नाते

जास्त प्रमाणात साखर आणि प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शरीरात ‘ग्लायकेशन’ प्रक्रिया वाढते. यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा सैल पडते.

Dangers of sitting for long hours

|

Sakal

स्नायूंची कमतरता आणि कमजोरी

व्यायाम न केल्यामुळे वयानुसार स्नायू कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होते. स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या अभावामुळे शरीर कमकुवत होऊन तुमची ऊर्जा कमी होते.

Dangers of sitting for long hours

|

sakal

असा करा स्वतःचा बचाव

दररोज किमान ६० ते ७५ मिनिटे व्यायाम करा. कामाच्या दरम्यान छोटे ब्रेक्स घ्या, संतुलित आहार ठेवा आणि ७-८ तास शांत झोप घ्या, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ तरुण राहाल.

Dangers of sitting for long hours

|

Sakal

झोपताना जाणवणाऱ्या ‘या’ त्रासांकडे करू नका दुर्लक्ष! हार्ट अटॅक असू शकतो

Heart attack night symptoms

|

sakal

येथे क्लिक करा