Aarti Badade
यकृत फक्त मद्यपानामुळेच बिघडत नाही. काही दैनंदिन सवयीसुद्धा यकृताला हळूहळू नुकसान करतात – त्या कोणत्या?
प्रक्रियायुक्त खाण्यापिण्यामुळे, विशेषतः फ्रुक्टोजमुळे, यकृतामध्ये चरबी साचते. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो.
पॅरासिटामॉल आणि तत्सम औषधांचा जास्त वापर.यकृताच्या पेशींवर विषारी परिणाम करू शकतो.डिटॉक्स कार्यात अडथळा निर्माण होतो.
शारीरिक हालचालींचा अभाव = लठ्ठपणा + इन्सुलिन प्रतिकारकता.चरबी यकृतात जमा होते, कार्यक्षमता कमी होते.फायब्रोसिस आणि दाह वाढतो.
"नैसर्गिक" म्हणजे नेहमीच सुरक्षित नाही!काही औषधींमध्ये विषारी धातू व स्टिरॉइड्स असतात यकृत निकामी होण्याचा धोका
उपाशी राहणे किंवा अचानक आहारबदल यामुळे चयापचय बिघडतो, यकृतावर ताण येतोपित्त निर्माणात अडथळा येतो.
सिगारेटमधील रसायने यकृताला रक्तपुरवठा कमी करतात,विषारी पदार्थ फिल्टर करताना यकृतावर ताण,दीर्घकालीन नुकसान