Aarti Badade
DIY फेस स्क्रब म्हणून साखर वापरणे चुकूनही टाळा. यामुळे चेहऱ्यावर जळजळ, कोरडेपणा आणि संसर्ग होऊ शकतो.
चेहरा गरम पाण्याने धुतल्याने त्वचेतली ओलसरता निघून जाते आणि त्वचा अधिक कोरडी व खडबडीत होते.
लिंबूमध्ये असलेले आम्ल त्वचेचे पीएच संतुलन बिघडवू शकते. त्यामुळे चेहऱ्यावर थेट लिंबू लावणे टाळा.
मुरुमांवर टूथपेस्ट लावल्यास जळजळ आणि संसर्ग होऊ शकतो. ही सवय त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहे.
बेकिंग सोडा पीएच बिघडवतो, ज्यामुळे मुरुमांची समस्या वाढू शकते. त्यामुळे याचा वापर चेहऱ्यावर करू नका.
बॉडी लोशन फक्त शरीरासाठीच असतो. चेहऱ्यावर लावल्यास मुरुमे आणि त्वचेसंदर्भातील अडचणी वाढू शकतात.
अत्यंत सुगंधी क्रीम्स किंवा लोशन्समुळे त्वचेवर अॅलर्जीक रिअॅक्शन होऊ शकतो. अशा उत्पादनांचा वापर चेहऱ्यावर करू नका.
चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.