Aarti Badade
शेवग्याच्या पानांची पावडर अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी घटकांनी समृद्ध आहे.ही पावडर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला संसर्गांशी लढण्यास मदत करते.
यामध्ये भरपूर फायबर असते, जे चयापचय सुधारते. चरबी जाळण्यास मदत होते आणि भूकेवर नियंत्रण ठेवते.त्यामुळे वजन नियंत्रित राहते.
फायबरयुक्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते.बद्धकोष्ठता, आम्लता आणि गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.आतड्यांचे आरोग्य सुधारते.
शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये व्हिटॅमिन बी आणि लोह भरपूर प्रमाणात असते. ही घटक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात, विशेषतः थकवा वाटत असल्यास उपयोगी.
अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मामुळे LDL (वाईट कोलेस्टेरॉल) कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
शेवग्याच्या पानांची पावडर व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स ने भरलेली आहे. त्वचा आतून स्वच्छ होते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
ही पावडर तुम्ही सूप, सॅलड किंवा स्मूदीत मिसळून रोजच्या आहारात घेऊ शकता. एक चमचा दररोज सेवन केल्यास आरोग्यावर उत्तम परिणाम होतो.