Aarti Badade
रात्री चांगली झोप मिळवण्यासाठी डोळ्यांना आराम देणे खूप महत्त्वाचे आहे.स्क्रीन वेळ कमी करणे आणि शांत वातावरण तयार करणे फायदेशीर ठरते.
Sakal
दिवसभर डोळे मिचकावणे विसरल्यामुळे ते कोरडे वाटू शकतात.झोपण्यापूर्वी डोळे पूर्णपणे बंद करून आणि उघडून मिचकावण्याचा सराव करा.
Sakal
मोबाईल, लॅपटॉपचा निळा प्रकाश (Blue Light) मेलाटोनिन हार्मोन निर्मितीमध्ये अडथळा आणतो.झोपण्याच्या किमान एक तास आधी सर्व गॅजेट्स बंद करा.
Sakal
झोपण्यासाठी खोली शांत आणि पूर्णपणे अंधारमय (Dark) ठेवा.यामुळे डोळ्यांना जास्तीत जास्त आराम मिळतो.
Sakal
जर डोळ्यांमध्ये जळजळ किंवा ताण जाणवत असेल, तर कोमट पाण्यात भिजवलेला स्वच्छ कपडा डोळ्यांवर ठेवा.यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
Sakal
तुमच्या खोलीतील हवा कोरडी असल्यास, ह्युमिडिफायर (Humidifier) वापरल्याने डोळ्यांना आवश्यक आर्द्रता मिळते.कोरड्या हवेमुळे होणारी डोळ्यांची आग कमी होते.
Sakal
गाजर, पालक यांसारखे व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ खा.दीर्घकाळ कोणतीही समस्या असल्यास, नेत्रतज्ञांचा (Ophthalmologist) सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Sakal
Sakal