Sleep Deprivation: थकवा नाही, धोका आहे! रोज ४ ते ५ तास झोपल्यास कोणते गंभीर परिणाम होतात, जाणून घ्या

Monika Shinde

४ ते ५ तास

तुम्ही रोज फक्त ४ ते ५ तास झोपत असाल तर आधी हे वाचा.

झोप कमी होते

धावपळीच्या आयुष्यात कामाचा आणि अभ्यासाचा ताण जास्त प्रमाणात मोबाईल वापरल्याने स्क्रिन टाइम मुळे झोप कमी होते. मात्र झोपेची कमतरता आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

मेंदू थकतो

कमी झोपेमुळे मेंदू थकतो. लक्ष केंद्रित करणे अवघड होते, स्मरणशक्ती कमी होते आणि निर्णय घेताना गोंधळ निर्माण होतो.

मानसिक शांतता बिघडते

पुरेशी झोप न झाल्यास चिडचिड, मूड स्विंग्स, चिंता आणि तणाव वाढतो. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते आणि मानसिक शांतता बिघडते.

संसर्गजन्य आजार

सलग कमी झोप घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि संसर्गजन्य आजार पटकन होतात.

हृदयावर परिणाम

झोपेची कमतरता हृदयावर परिणाम करते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते.

मधुमेहाचा धोका

कमी झोपेमुळे भूक वाढते, वजन नियंत्रणात राहत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो. शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडतो.

तज्ज्ञांच्या मते

दररोज ७ ते ९ तास झोप आवश्यक आहे. निरोगी शरीर, शांत मन आणि दीर्घायुष्यासाठी झोपेला प्राधान्य द्या.

Glassy Skin Tips: थंडीमध्ये Glassy Skin हवी? रात्री ही Night Cream नक्की लावा!

येथे क्लिक करा