Aarti Badade
रात्री झोप न येणे ही आता मोठी समस्या झाली आहे. महागड्या गोळ्या घेण्याऐवजी शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेचा वापर करून तुम्ही झटपट झोप मिळवू शकता.
Home Remedies for Deep Sleep
Sakal
झोप लागण्यासाठी शरीराचे अंतर्गत तापमान कमी होणे गरजेचे असते. पाय उबदार केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील उष्णता बाहेर पडल्याने मेंदूला झोपेचे संकेत मिळतात.
झोपण्यापूर्वी मोजे घातल्याने पायांच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे शरीराचे तापमान संतुलित होऊन नेहमीपेक्षा १० ते १५ मिनिटे लवकर आणि सलग झोप लागण्यास मदत होते.
Home Remedies for Deep Sleep
Sakal
ज्यांना मोजे घालून झोपणे आवडत नाही, त्यांनी झोपण्यापूर्वी १० मिनिटे पाय कोमट पाण्यात ठेवावेत. हा उपाय मेलाटोनिनच्या गोळ्यांइतकाच प्रभावी ठरतो आणि दिवसभराचा थकवा क्षणात घालवतो.
Home Remedies for Deep Sleep
Sakal
शांत झोपेसाठी खोलीचे तापमान किंचित थंड असावे आणि पाय उबदार असावेत. हे 'कॉम्बिनेशन' मेंदूला शांत ठेवते आणि रात्री वारंवार जाग येण्याची समस्या दूर करते.
Home Remedies for Deep Sleep
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्या. जायफळ हे नैसर्गिक निद्राजनक असून ते मज्जासंस्थेला शांत करून गाढ झोप येण्यास मदत करते.
Home Remedies for Deep Sleep
Sakal
जर तुम्हाला मानसिक ताण जास्त असेल, तर दुधात अश्वगंधा पावडर किंवा भिजवलेले बदाम घालून घ्या. यामुळे मेंदूतील तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता (Sleep Quality) सुधारते.
Home Remedies for Deep Sleep
Sakal
झोपेच्या गोळ्यांची सवय लागण्यापेक्षा हे नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आहेत. आजच या सोप्या टिप्स फॉलो करा आणि उद्याची सकाळ उत्साहात साजरी करा!
Home Remedies for Deep Sleep
Sakal
Winter Lip Care
Sakal