Saisimran Ghashi
हल्ली रात्री शांत झोप न येणे, अचानक जाग येणे या समस्या वाढल्या आहेत.
धावपळीचे जीवन, मानसिक ताण अशा अनेक कारणांमुळे हा त्रास होतो.
पण शांत झोप येण्यासाठी तुम्ही झोपेच्या गोळ्या खायची गरज नाही.
अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही झोपेची गुणवत्ता सुधारू शकता.
रात्री झोपताना दूध आणि केळी खाल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते.
रात्री झोपण्यापूर्वी ओटमिल खाल्ल्यास तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
पण रोज ओट्स खाणे शक्य नसल्यास, ग्लासभर पाण्यात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्या.
याने तुम्हाला लवकर झोप येईल. पण हा प्रयोग 2-3 दिवसच करा, यांची सवय लावून घेऊ नका.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.