रात्री झोपेत अचानक बोलता? दुर्लक्ष करण्यापूर्वी हे वाचा

Aarti Badade

झोपेत

झोपेत बोलणे, पुटपुटणे किंवा न समजणारे आवाज काढण्याला वैद्यकीय भाषेत ‘सोम्निलोक्वी’ म्हटले जाते.

Sleep Talking

|

Sakal

झोपेत बोलणे नेहमी आजाराचे लक्षण नसते

अधूनमधून झोपेत बोलणे सामान्य असू शकते आणि अनेकदा त्यामागे कोणताही गंभीर आजार नसतो.

Sleep Talking

|

Sakal

तणाव आणि अपुरी झोपही कारणीभूत

तणाव, चिंता, मानसिक थकवा, ताप आणि पुरेशी झोप न मिळणे यामुळे झोपेत बोलण्याची समस्या वाढू शकते.

Sleep Talking

|

Sakal

झोपेत बोलणे म्हणजे स्वप्नांचा अर्थ नाही

व्यक्ती झोपेत जे बोलते ते तिच्या स्वप्नातील घटना किंवा खऱ्या विचारांचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

Sleep Talking

|

Sakal

कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

झोपेत बोलण्यासोबत ओरडणे, हिंसक हालचाली, अचानक जाग येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Sleep Talking

|

Sakal

दिवसा जास्त झोप येत असेल तर लक्ष द्या

झोपेत बोलण्याची समस्या अचानक सुरू होऊन वाढत असेल आणि दिवसा खूप झोप येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Sleep Talking

|

Sakal

चांगल्या झोपेसाठी या सवयी ठेवा

नियमित झोपेची वेळ पाळा, रात्री कॅफीन कमी करा आणि झोपण्यापूर्वी मोबाईल-लॅपटॉपचा वापर मर्यादित ठेवा.

Sleep Talking

|

Sakal

माकडे मरताना का दिसत नाहीत? मृत्यूसमयी कुठे जातात?

Monkey Death Mystery

|

Sakal

येथे क्लिक करा