Payal Naik
झोप ही आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय असते. ती शरीरासाठी खूप आवश्यकदेखील असते.
नेमकं किती तास झोपावं, याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत.
मात्र सर्वसाधारणपणे २० वर्षांवरील व्यक्तींसाठी २४ तासांमधील ६ ते ७ तास झोप खूप आवश्यक आहे.
काही कलाकार त्यांच्या झोपेबद्दल खूप जागरूक आहेत.
अभिनेत्री कतरीना कैफ ७ तासांची झोप घेते आणि सकाळी ६. ४५ वाजता उठते.
शाहरुख खान सगळ्यात कमी झोप घेतो. तो पहाटे ५ वाजता झोपतो आणि सकाळी ९ किंवा १० वाजता उठतो.
अक्षय कुमार रात्री ९ वाजता झोपतो आणि पहाटे ५ किंवा ५. ३० वाजता उठतो.
अजय देवगनदेखील रात्री ९ ते ९. ३० पर्यंत झोपतो आणि पहाटे ४. ३० वाजता उठतो.
सिद्धार्थ मल्होत्रा देखील रात्री ७ ते ८ तासांची पूर्ण झोप घेतो.
आमिर खानदेखील रात्री लवकर झोपतो. तो देखील रात्री ७ तासांची झोप पूर्ण करतो.