Saisimran Ghashi
हल्ली धकाधकीच्या जीवनात शांत झोप फार मोलाची झाली आहे.
रात्री शांत झोप लागल्यास दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटते. स्फूर्ति येते.
पण अनेक कारणांमुळे रात्री उशिरा झोप येणे किंवा अचानक जाग येण्याची समस्या होते.
लोक याच्यावर अनेक उपाय करत असतात पण त्यांना शांत झोप लागत नाही.
आम्ही तुम्हाला एक असा रामबाण उपाय सांगणार आहे ज्याने तुम्हाला शांत झोप लागेल.
रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर जायफळ पावडर टाका आणि प्या.
असे केल्यास तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत मिळेल.
आठवडाभर हा उपाय केल्यास तुमच्या शरीराला आपोआप लवकर झोपण्याची सवय लागेल. मग तुम्ही हा उपाय बंद करू शकता.
ही केवळ सामान्य माहिती आहे. हा उपाय करण्यापूर्वी आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.