Aarti Badade
जेवणानंतर झोपणे – आराम की आरोग्यावर घाला? दुपारी झोपल्याने ताजेतवाणं वाटतं, पण ती सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
२०-३० मिनिटांची पॉवर नॅप फायदेशीर. ही झोप ऊर्जा वाढवते आणि कार्यक्षमता सुधारणारी असते.
जास्त वेळ झोपल्यास धोका वाढतो.हृदयरोग, मधुमेह आणि नैराश्याचा धोका वाढतो – हार्वर्ड अभ्यासानुसार.
दिवसाची जास्त झोप रात्रीची झोप बिघडवते. यामुळे झोपेच्या चक्रात अडथळा येतो आणि थकवा वाढतो.
रात्री नीट झोप झाली नाही तर दिवसभर सुस्ती. यामुळे एकाग्रता कमी होते आणि मानसिक आरोग्य बिघडते.
दिवसा सतत झोप येते? मग कारण शोधा. रात्री ७-८ तास झोप मिळत नसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
फक्त २० मिनिटांची झोप ठेवा. दिवसातील झोप मर्यादित ठेवा आणि आरोग्यदायी झोपेच्या सवयी अंगीकारा.